मुंबईत २६ जुलैला ठाकरे बंधूंचा मोर्चा

Foto
मुंबई : दिल्लीसह राज्यभरात सुरू असलेल्या नीट परिक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरती आणि केंद्र सरकारच्या भुमिकेवरती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत विद्यार्थी आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी २६ जुलै रोजी शिवतीर्थ पासून सिद्धिविनायक पर्यंत मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली. सकाळी ११.३० वाजता मोर्चाला सुरूवात होणार आहे.
 
यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की,आंदोलन शांततामय परिस्थितीत सुरू होते, केंद्रातून त्या आंदोलकांवर दबाव आणला जात आहे, त्याचे परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात उमटत आहेत, भाजप जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी देखील अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते. काँग्रेसच्या काळात जेव्हा आम्ही राजीनामे मागितले तेव्हा दिले गेले, आर आर पाटील यांचे कसाबच्या वक्तव्यामुळे त्यांचा ही राजीनामा घेण्यात आला होता. नीटचा पेपर पहिल्यांदा फुटला नव्हता ही तिसरी वेळ आहे. जेव्हा  परिक्षा सुरू केली तेव्हाच आम्ही विरोध केला होता. आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जात होता. पण आता प्रश्न तिथपर्यंत राहिला नाही. आता ते पीएम पर्यंत गेला आहे. त्यांनी आज काही तरी ट्वीट केले आहे. आधीच जर त्यांच्यासोबत चर्चा केली असती तर हे झाले नसते. शिखांच आंदोलन झाले, त्यांच्याशी देखील बोलणे केले नाही. मणिपूर मध्ये देखील कोणतीही चर्चा केली नाही. ही कोणती सत्ता आणि हा कोणत्या सत्तेचा माज आहे, असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 

तर याप्रकरणावर बोलताना शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, हा विषय आता  पुरता राहिला नाही. न्यायमूर्ती यांना या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे बोलत आहे. मुलींना मारले गेले आहे. लाठ्या काठ्याने मारले गेले. खिळे लावून मारले कपडे फाडले. न्यायलयाला कुत्रे कबूतरे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे. हे ध्रुत राष्ट्र होऊ लागले आहे. सिविल ड्रेसमधल्या गुंडांच्या हातात पोलिसांच्या काठ्या कश्या आल्या? हे आंदोलन मोडायला भाजपने पाकिस्तान मधून लोक आणली का? ही गुंडागर्दी सुरू असताना कोणी ही गप्प बसू नये. या रविवारी देशाची ताकद दाखविण्यासाठी एकत्र यायचं आहे, आपण आधी सिद्धिविनायकला साकडं घालू सरकारला सुबुद्धी दे नाही तर हे घालवं, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.